सरकारनामा ब्यूरो
भाजप नेते आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती आहेत.
ते मूळचे राजस्थानातील किठाण या गावचे आहेत.
त्यांनी राजस्थानच्या चित्तोडगड येथील सैनिकी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
राजस्थान येथील जयपूर विद्यापीठातून त्यांनी वकिली विषयात पदवी प्राप्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील असलेले धनखड हे वयाच्या 35 व्या वर्षी हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष बनले.
राजस्थानातील जाट समुदायाला आरक्षण मिळवून देणारे ते यशस्वी वकील आहेत.
जनता दलामधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करुन 1989 मध्ये झुंझुनूमधून ते खासदार म्हणून निवडून आले.
पश्चिम बंगालचे राज्यपाल बनल्यानंतर ते देशाचे १४ वे उपराष्ट्रपती झाले.