Pradeep Pendhare
निलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री केले होते.
उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. त्यातूनच त्यांनी 19 वर्षांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
निलेश राणे आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राणे कुटुंबीयांच्या राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले.
निलेश राणेंनी गेल्यावर्चा राजकीय संन्यासाचा निर्णय जाहीर केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी 24 तासांतच तो मागे घेतला.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झाला.
निलेश राणे यांनी 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवत दिल्ली गाठली होती. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असून, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना'UBT' पक्षाचे वैभव नाईक कुडाळचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना तेथून मताधिक्य मिळाल्यानं विधानसभेला तिथं नाईकविरुद्ध राणे, अशा लढतीची शक्यता.