2 वेळा मंत्री अन् 5 वेळा आमदार राहिलेल्या भाजप नेत्याचं निधन; CD प्रकरणामुळे उडाली होती खळबळ

Jagdish Patil

विजय सिंह मनकोटिया

हिमाचल प्रदेशातील ज्येष्ठ नेते मेजर विजय सिंह मनकोटिया यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.

Vijay Singh Mankotia

आमदार

ते शाहपूर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. शिवाय ते 2 वेळा मंत्री राहिले होते.

Vijay Singh Mankotia | Sarkarnama

अध्यक्ष

मनकोटिया यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1938 रोजी झाला. ते दीर्घकाळ माजी सैनिक लीगचे अध्यक्ष होते.

Vijay Singh Mankotia | Sarkarnama

अपक्ष

लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर 1982 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शाहपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजय झाले.

संघर्ष

हिमाचल प्रदेशचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांच्यांशी त्यांचा राजकीय संघर्ष होता.

Vijay Singh Mankotia

CD प्रकरण

मनकोटिया यांनी वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याच काळात कथित CD प्रकरण बरेच चर्चेत आले होते.

Sarkarnama

प्रवेश

मनकोटिया यांनी काँग्रेससोबतच जनता दल आणि अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली. 1985 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Vijay Singh Mankotia | Sarkarnama

बसपा

2007 ची विधानसभा त्यांनी 'बसपा'च्या तिकिटावर लढवली; मात्र त्यांचा पराभवाचा झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पराभूत

2012 ला ते काँग्रेसच्या तिकिटावर लढले पण पराभूत झाले. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला.

Vijay Singh Mankotia | Sarkarnama

भाजप

त्यावेळी ते 'आप'मध्ये प्रवेश करणार, अशा राजकीय चर्चा सुरू होत्या. मात्र, अखेरीस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Vijay Singh Mankotia | Sarkarnama

NEXT : दुष्काळ जाहीर होताच सरकारचा मोठा निर्णय; कर्ज, वीजबिलासह ‘या’ सवलती मिळणार

Maharashtra Drought Relief | Sarkarnama
क्लिक करा