Vikas Mhatre - प्रदेश कार्याध्यक्षांच्या मतदारसंघातच भाजपला धक्का देणारे विकास म्हात्रे आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

भाजपचे माजी नगरसेवक -

डोंबिवली पश्चिम येथील गरीबाचापाडा प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे (माजी नगरसेविका) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द -

विकास म्हात्रे यांनी भाजप कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्याकडे भाजप पदाधिकारी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला.

Vikas Mhatre | sarkarnama

रविंद्र चव्हाणांवर आरोप -

भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर आरोप करत विकास म्हात्रेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

कविता म्हात्रे यांचाही राजीनामा -

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.

Vikas Mhatre | sarkanama

तीनवेळा नगरसेवक -

विकास म्हात्रे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.

Vikas Mhatre | sarkarnma

माजी स्थायी समिती सभापती -

विकास म्हात्रे हे महापालिकेत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती देखील होते.

Vikas Mhatre | sarkarnama

महापालिकेतील गटनेते -

याशिवाय विकास म्हात्रे यांनी महापालिकेतील पक्षाचे गटनेते पदही सांभाळलेलं आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

मान-सन्मान मिळेल तिथे जाणार -

आता ज्या पक्षात मला मान-सन्मान मिळेल, त्या पक्षात मी जाणार असल्याचे विकास म्हात्रेंनी सांगितले आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

उद्धव ठाकरेंकडे जाणार?-

तर विकास म्हात्रे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

निधी मिळत नाही -

प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नाही, आमदार चव्हाण मदत करत नसल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.

Vikas Mhatre | sarkarnama

Next - भारतात किती कोटी लोक नशेच्या गर्तेत अडकलेले आहेत?

sarkarnama
येथे पाहा