Pradeep Pendhare
विकसित महाराष्ट्र-2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला तसंच अंमलबजावणीसाठी युनिट स्थापनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047पर्यंत “विकसित भारत-भारत @2047” करण्याचा संकल्प केला आहे.
“विकसित महाराष्ट्र-विकसित भारतासाठी” स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षी महाराष्ट्राला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था घडवायची आहे.
व्हिजन डॉक्युमेंट 2 ऑक्टोबर 2029चे अल्पकालीन व्हिजन, 1 मे 2035 चे मध्यमकालीन व्हिजन, आणि 15 ऑगस्ट 2047चे दीर्घकालीन व्हिजन, असे तीन टप्पे असतील.
व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी 16 क्षेत्रीय गट स्थापन करण्यात आले असून, सुमारे 100 उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
कृषि, सेवा, उद्योग, पर्यटन आणि उलाढाल वाढविणे.
नागरी/शहरी, पाणी, ऊर्जा आणि शाश्वतता, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स, कनेक्टिव्हिटी निर्माण करणे.
शिक्षण आणि कौशल्य विकास, समाज कल्याण, आरोग्य, सॉफ्ट पॉवरला जागतिक मान्यता मिळवणे.
प्रशासन, सुरक्षा, तंत्रज्ञान, वित्त मॉडेलद्वारे शाश्वत वित्तीय मार्ग निश्चित करणे.