Vilas Bhumre : ...त्यामुळे पैठणचे भावी आमदार म्हणून विलास भुमरेंच्या नावाची सुरू आहे जोरदार चर्चा!

Mayur Ratnaparkhe

विलास भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आहेत.

सध्या पैठणचे भावी आमदार म्हणून त्यांच नाव चर्चेत आहे.

पैठणमधून पाचवेळा आमदार राहिलेल्या संदीपान भुमरेंचा राजकीय वारसा विलास भुमरे पुढे चालवतील असं बोललं जात आहे.

विलास भुमरे हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

याशिवाय पैठण विधानसभा मतदारसंघातील बरीच जबादारी विलास भुमरे यांनी हाती घेतली होती.

संदीपान भुमरेंकडे पालकमंत्री पद आल्याापासून विलास भुमरेंनी जिल्ह्याच्या राजकारणात अधिक लक्ष घालणं सुरू केलं

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि वडिलांना निवडून आणण्यात विलास भुमरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Next : विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे शिलेदार

Mahayuti's Candidate | Sarkarnama
येथे पाहा