विमला गुंज्याल यांनी घडवला इतिहास; पोलिस महानिरीक्षक पदावरून निवृत्त होताच बनल्या सरपंच

Rajanand More

कमला गुंज्याल

देशात विमला गुंज्याल या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. माजी आयपीएस अधिकारी कमला या नुकत्याच पोलिस महारनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाल्या असून लगेच त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे.

Vimala Gunjyal | Sarkarnama

गुंजी गाव

विमला या उत्तराखंडमधील गुंजी या छोट्याशी गावच्या सरपंच बनल्या आहेत. त्यांनी बिनविरोध निवड झाली. हे गाव भारत आणि चीनच्या सीमेवर असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Vimala Gunjyal | Sarkarnama

35 वर्षे सेवा

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तब्बल 35 वर्षे त्यांनी पोलिस दलात सेवा केली आहे. आता त्यांनी आपल्या गावची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vimala Gunjyal | Sarkarnama

राष्ट्रपती पदक

पोलिस दलातील सेवेबद्दल विमला यांना २०१९ मध्ये राष्ट्रपती पोलिस पद देऊन गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Vimala Gunjyal | Sarkarnama

गावकऱ्यांचा आग्रह

निवृत्तीनंतर गावकऱ्यांच्या आग्रहाखातर विमला यांनी सरपंचपद स्वीकारत गावच्या विकासासाठी झोकून दिले आहे. गावात त्यांच्याविरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.

Vimala Gunjyal | Sarkarnama

पहिल्यांदाच बिनविरोध

स्वातंत्र्यानंतर गावांत आतापर्यंत कुणीही सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले नव्हते. विमला यांची बिनविरोध निवड झाल्याने इतिहास घडला आहे. गावकऱ्यांनीही ही निवड ऐतिहासिक म्हटली आहे.

Vimala Gunjyal | Sarkarnama

काय म्हणाल्या?

निवडीनंतर विमला गुंज्याल म्हणाल्या की, गावकऱ्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली. आता गावातील स्वच्छता, विकास आणि पायाभूत सुविधांसाठी शिस्तबध्दपणे काम करेन.

Vimala Gunjyal | Sarkarnama

एवढी चर्चा का?

गुंजी हे गाव केंद्र सरकारच्या व्हायब्रंट व्हिलेज या कार्यक्रमांतर्गत येते. सीमेवरील गावांसाठी ही योजना आहे. आता एक अनुभवी आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी सरपंच बनल्याने गावासाठी ही सकारात्मक गोष्ट बनल्याची चर्चा आहे. 

Vimala Gunjyal | Sarkarnama

NEXT : बिहारची लेक आहे एका देशाची पहिली महिला पंतप्रधान; 38 वर्षांपासून राजकारणात

येथे क्लिक करा.