Vinay Mohan Kwatra : कोण आहेत विनय मोहन क्वात्रा? अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत

Rajanand More

विनय मोहन क्वात्रा

भारताचे अमेरिकेतील नवे राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

परराष्ट्र सचिव

क्वात्रा हे जुलै 2024 मध्येच परराष्ट्र सचिव या पदावरून निवृत्त झाले आहेत. आता त्यांच्यावर अमेरिकेची जबाबदारी देण्यात आली आहे.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

वरिष्ठ अधिकारी

विनय मोहन क्वात्रा हे 1988 च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

मोदींची पसंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममधील अधिकारी म्हणून क्वात्रा यांची ओळख होती. त्यामुळेच निवृत्तीनंतर महत्वाचे जबाबदारी दिल्याचे मानले जाते.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

नेपाळचे राजदूत

नेपाळमधील भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. या काळात दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यात मोठा वाटा.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

1993 पर्यंत जीनेव्हात

क्वात्रा यांनी 1993 पर्यंत जीनेव्हामध्ये भारताच्या स्थायी मिशनचे तिसरे सचिव आणि त्यानंतर द्वितीय सचिव म्हणून काम केले.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

चीन, रशियातही काम

चीन, रशिया आणि डरबनमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासामध्ये काम. अफगाणिस्तान, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटनेतही महत्वाची जबाबदारी पार पाडली.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

पंतप्रधान कार्यालय

2015 ते 2017 या काळात पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव या पदावर कार्यरत होते. त्यानंतर फेब्रुवारी 2020 पर्यंत फ्रान्सचे राजदूत.  

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

फ्रेंच, रशियन भाषा

क्वात्रा यांना हिंदी आणि इंग्रजीप्रमाणेच ते फ्रेंच आणि रशियन भाषा बोलू शकतात. त्यांना विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Vinay Mohan Kwatra | Sarkarnama

NEXT : अजित पवारांनी थेट विशाळगड गाठत स्थानिकांचीच घेतली भेट!

येथे क्लिक करा.