Mayur Ratnaparkhe
उच्च शिक्षण विभागाचे विद्यमान सचिव विनीत जोशी यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
विनीत जोशी हे १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. ममिदाला जगदीश कुमार यांच्या निवृत्तीनंतर विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विनीत जोशी हे या पदावर कायमस्वरूपी कुणाची नियुक्ती होईपर्यंत किंवा सरकारकडून नवीन आदेश जारी होईपर्यंत राहतील.
विनीत जोशी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
यानंतर विनीत जोशी यांनी नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT) मधून आंतरराष्ट्रीय व्यापारात एमबीए पूर्ण केले.
विनीत जोशी एमबीएमध्ये सुवर्णपदक विजेतेही आहेत.
विनीत जोशी यांनी त्याच संस्थेतून गुणवत्ता व्यवस्थापनात पीएचडी देखील मिळवली आहे.
२ नोव्हेंबर १९६८ रोजी उत्तर प्रदेशात जन्मलेले विनीत जोशी हे १९९२ च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
जुलै २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत मणिपूरचे मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.