सरकारनामा ब्यूरो
आयएएस ऑफिसर होण्याचं अनेकांचे स्वप्न असते. अधिकारी झाल्यानंतर मात्र अनेकदा पैसे मिळवण्याच्या नादात काही चुकीचे मार्ग निवडतात.
ओडिशा ग्रामीण गृहनिर्माण विकास महामंडळच्या घोटाळ्यात विनोद कुमार यांचे नाव आले आहे. त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
या घोटाळ्यात दोषी ठरवण्याआधी त्यांना भ्रष्टाचाराविरोधातील अन्य 10 प्रकरणामध्ये दोषी ठरविले आहे.
भुवनेश्वर न्यायालयाने त्यांना निधीचा गैरवापर केल्याच्या प्रकारणात दोषी ठरवत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
विनोद कुमार यांच्यावर होम लाइफ बिल्डर्सनाच्या 38 डुप्लेक्स बांधकामासाठी कर्ज देणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी वितरित केल्याचा आरोप आहे.
विनोद कुमार हे ओडिसा केडरचे अधिकारी आहेत.
विनोद यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक आणि एमटेक केले आहे. यानंतर UPSCची परीक्षा देत 1989 ला ते IAS बनले.