Vinod Patil : छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले विनोद पाटील आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Vinod Patil | Sarkarnama

विनोद पाटील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत.

Vinod Patil | Sarkarnama

विनोद पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा होती. 

Vinod Patil | Sarkarnama

परंतु बुलडाण्याहून परतण्यास मुख्यमंत्री शिंदे यांना उशीर झाल्याामुळे विनोद पाटील हे स्वतः चिकलठाणा विमानतळावर जाऊन त्यांना भेटले. 

Vinod Patil | Sarkarnama

पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे त्यांनी स्वागत केले. घाईत दौरा झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जेवण राहिले होते, त्यांच्यासाठी विनोद पाटील यांच्या घरून खास डबा मागवला होता.

Vinod Patil | Sarkarnama

मी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले आहे. 

Vinod Patil | Sarkarnama

विनोद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. आबा यांचे कट्टर समर्थक होते.

Vinod Patil | Sarkarnama

विनोद पाटील यांनी संभाजीनगर मध्य मधून विधानसभा निवडणूक लढवलेली आहे, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

Vinod Patil | Sarkarnama

मात्र आता  मला विश्वास आहे इलेक्टीव मेरिटवर एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली आहे.

Vinod Patil | Sarkarnama

NEXT : सांगलीत नाही मिळाली उमेदवारी; विशाल पाटलांची थेट बंडखोरी...

Vishal Patil | Sarkarnama
येथे पाहा