Aslam Shanedivan
हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी वृंद यांची ‘रसरी आवत जात तें, सिल पर परत निसान..’ ही कविता यूपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी गुरुकिल्ली आहे
या कवितेतून कठोर परिश्रम, समर्पण आणि संयम ठेवण्याची शिकवण दिली आहे. याच कवितेतील प्रत्साहनातून आयएएस अधिकारी विशाल नरवडे यांनी यश मिळवले आहे
आयएएस विशाल नरवडे यांनी यूपीएससी परीक्षा पाच वेळा दिली असून ते 6 व्या प्रयत्नात आयएएस झाले
विशाल नरवडे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले आयएएस असून त्यांचे शालेय शिक्षण लातूरमध्येच झाले आहे.
विशाल नरवडे यांनी जबलपूर आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी आयएएस अधिकारी बनून देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं
आयएएस पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले असून पाच वेळा ते या प्रयत्नात अपयशी झाले आहेत. पण 2016 मध्ये ते पहिली यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि आयपीएस झाले.
त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले, व देशात 91 वी रँक मिळवत आयएएस झाले.