सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे मानले जाणारे IAS अधिकारी अभिषेक प्रकाश यांचे निलंबन केले आहे. काय आहे, कारण वाचा...
IAS अधिकारी अभिषेक प्रकाश हे लखनऊचे जिल्हा दंडाधिकारी आणि सध्या इन्व्हेस्ट यूपीच्या सीईओची जबाबदारी ते सांभाळत आहेत.
IAS अभिषेक यांच्यावर सौरऊर्जा उद्योग स्थापना करण्यासाठी अर्ज केलेल्या उद्योजकांकडून कमिशन मागितल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत.
त्यांनी एका मध्यस्थामार्फत उद्योजकाकडून पाच टक्के कमिशन मागितले होते. या प्रकरणाची तक्रार उद्योजकाने मुख्यमंत्री योगी यांच्याकडे केली.
प्रकरणांची चौकशी करत मध्यस्थ असलेले निकांत जैन यांच्यावर गोमती नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आणि त्यानंतर IAS अभिषेक यांचे निलंबन करण्यात आले.
निलंबन करण्यात आलेले अभिषेक हे मूळचे बिहारचे रहिवासी असून, ते 2006 बॅचचे IAS अधिकारी आहेत.
अभिषेक प्रकाश यांनी आयआयटी रुरकी येथून बी.टेकची पदवी प्राप्त केली. 2005 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी ऑल इंडियातून 8वा रँक मिळवला.