Roshan More
व्लादीमीर पुतीन हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी वापरलेली त्यांची कार चर्चेत आली आहे.
पुतीन हे वापर असलेल्या कारचे नाव ऑरस सिनेट आहे. ही कार रशियातील कंपनी ऑरस मोटार्स कंपनी बनवते.
ही कार इतकी सुरक्षित आहे की तिला 'चाकावरचा किल्ला' म्हटले जाते.
ही कार बुलेटप्रुफ असते तसेच हिच्यावर ग्रेनाईट टाकले तरी आतली व्यक्ती सुरक्षीत राहते.
या कारचे चाक पंक्चर झाले तरी त्यातून प्रवास करता येऊ शकतो इतकी ती सुरक्षित असते.
ऑरस सिनेट कार जेव्हा पुतीन यांच्यासाठी निवडली जाते तेव्हा तिच्या मध्ये काही खास बदल केले जातात. त्यामुळे ती अधिक सुरक्षित बनते.
या कारची किंमत दोन ते तीन कोटी रुपये असते. मात्र, पुतीन वापरत असलेल्या कारमध्ये काही बदल केलेल्या असतात तिची किंमत पाच कोटीहून अधिक आहे.
ही कार सामान्य लोकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध नाही. रशियातील महत्त्वाचे नेते आणि निवडक लोकांसाठी उपलब्ध आहे.