Roshan More
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे भारत भेटीवर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.
भारताकडून पुतिन यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्या आहेत. मात्र, रशियातून पुतिन यांच्या सोबत त्यांचे सुरक्षारक्षक देखील आले आहेतय
रशियाची गुप्त सुरक्षा एजन्सी संघीय सुरक्षा सेवा (IFO) द्वारे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांचे बाॅडीगार्ड निवडले जातात.
पुतिन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल बाॅडीगार्ड हे वयाच्या 35 व्या वर्षी रिटायर होतात.
मिडिया रिपोर्टनुसार पुतिन यांचा बाॅडी डबल देखील आहे. जेथे जास्त धोका आहे तेथे बाॅडी डबलला पाठवले जाते.
पुतिन यांच्या ताफ्यात ऑरस कार आहे. ही कार बुलेटप्रुफअसून ग्रेनेड हल्लाचा परिणाम या कारवर होत नाही.
सांगितले जाते की, पुतिन याचे जेवण चेक करण्यासाठी पर्सनल लॅब आहे.
पुतिन हे इल्युशियन IL 96-300 PU या विमानाने प्रवास करात. या विमानातून अणू बाॅम्ब हल्ल्यासाठी ते कमांड देऊ शकतात.