Ganesh Sonawane
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रपती आहेत.
पुतीन यांची एकुण संपत्ती अंदाजे २०० अब्ज डॉलर्स इतकी आहे.
पुतीन यांना वार्षिक 140,000 डॉलर (सुमारे 11.7 कोटी रुपये) पगार मिळतो.
अमेरिकेतील प्रतिष्ठित मॅगझिन 'फॉर्च्यून'च्या 2015 च्या एका अहवालात पुतीन यांच्याकडे 20 हून अधिक आलिशान राजवाडे आणि सुमारे 700 गाड्या असल्याचं सांगण्यात आलं होतं.
याशिवाय त्यांच्याकडे 58 खासगी विमाने आणि 'द फ्लाइंग क्रेमलिन' नावाचे एक हेलिकॉप्टर देखील आहे.
2007 मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिकेसमोर सादर केलेल्या अहवालात पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला होता.
पुतीन यांच्याप्रमाणेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील जगातील सर्वात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या राष्ट्रपतींमध्ये गणले जातात.
ट्रम्प यांची एकुण संपत्ती सुमारे 7.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे.