सरकारनामा ब्युरो
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बोगस मतदानाचा मुद्दा प्रचंड गाजला होता.
विरोधकांनी ईव्हीएम आणि बोगस मतदारांवरुन गंभीर आरोप केले होते.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही मतदान याद्यांवर शंका उपस्थित केली होती.
त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदान कार्ड आधार कार्डला लिंक केल्यास एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद टाळली जाण्यास मदत होऊ शकते.
तसेच मतदार यादीतील बोगस नावांमुळे उडणारा गोंधळ कमी होऊन अधिक पारदर्शी कारभार पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
आधारकार्ड लिंकिंगमुळे निवडणूक प्रक्रियेतही पारदर्शकता येऊ शकते दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.
या प्रक्रियेसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
मतदारांना त्यांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी ठराविक कालावधीही दिला जाणार आहे.
ऑनलाईन आणि ऑफलाईन असेही दोनही पर्याय त्यासाठी उपलब्ध राहणार असल्याची शक्यता आहे.
तसेच मतदारांची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याविषयी खबरदारी घेण्याबाबतची खात्री देण्यात आली आहे.
देशातील आमदारांची संपत्ती किती? कोणत्या राज्यातील आमदार आहेत श्रीमंत? जाणून घ्या क्लिकवर...