मतदारांनो, तुम्हीही करु शकता निवडणूक आयोगाला सूचना; ECINet काय आहे

Mangesh Mahale

ECINet

निवडणूक आयोगाने ECINet हे नवीन एकात्मिक ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या सूचना देण्याचे आवाहन केले आहे.

ECINet | Sarkarnama

सूचना

ॲपमधील ‘Submit a Suggestion’ या पर्यायाद्वारे नागरिक आपल्या सूचना नोंदवू शकतात.

ECINet | Sarkarnama

इंडेक्स कार्ड

ECINet ॲपमुळे मतदानाच्या टक्केवारीचे कल त्वरित उपलब्ध करून देणे आणि मतदानानंतर फक्त ७२ तासांच्या आत इंडेक्स कार्ड प्रसिद्ध करणे अशा सुविधा पूरविणे शक्य होणार आहे.

ECINet | Sarkarnama

बिहार

बिहार विधानसभा निवडणूक २०२५ तसेच विविध पोटनिवडणुकांवेळी या ॲपची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ECINet | Sarkarnama

सुधारणा

निवडणूक नोंदणी अधिकारी, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे या ऍप मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

ECINet | Sarkarnama

परीक्षण

आता नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांचेही परीक्षण करून ॲपला अधिक वापरकर्ताभिमुख बनवले जाणार आहे.

ECINet | Sarkarnama

सुविधा

ECINet हे एकाच ठिकाणी विविध निवडणूक-संबंधित सुविधा उपलब्ध करणारे एकात्मिक ॲप आहे.

ECINet | Sarkarnama

40 ॲप्लिकेशन्स

यात Voter Helpline App, cVIGIL, Saksham, Voter Turnout App, Know Your Candidate आदींसह एकूण ४० स्वतंत्र ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

ECINet | Sarkarnama

NEXT: दिल्ली मेट्रोच्या 75 लाख प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी मराठी माणसाच्या खांद्यावर!

येथे क्लिक करा