Voting List : मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधायचं? जाणून घ्या...

सरकारनामा ब्यूरो

निवडणूक आयोग

सर्व मतदारांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. आपले नाव मतदान यादीत आहे की नाही? हे कसं शोधायचं ते जाणून घेऊयात.

Voting List | Sarkaranama

मोबाईल

मतदान केंद्रावर ऐनवेळी मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी मोबाईलवर अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत.

Voting List | Sarkaranama

'व्होटर हेल्पलाइन'

'व्होटर हेल्पलाइन' या नावाने ॲप तयार केलं असून यामुळे मतदार यादीतील नावे तुम्ही घरबसल्या शोधू शकता. हे ॲप डाऊनलोड करा, त्यानंतर न्यू युजरवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा.

Voting List | Sarkaranama

गेस्ट युजर

लॉगिन केल्यानंतर ‘search your name in electoral roll’ या सर्च बॉक्सवर क्लिक करा. इथे क्लिक करताच मतदान यादीतील नाव आणि मतदान केंद्राचे चार पर्याय दिसतील.

Voting List | Sarkaranama

चार पर्याय

पहिल्या पर्यायामध्ये तुम्ही मोबाईल नंबर टाकून माहिती मिळवू शकता. तर दुसऱ्या पर्यायाध्ये मतदान कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून येथे विचारलेली माहिती भरुन किंवा मतदान कार्डवरील EPIC नंबर भरून तुम्ही नाव शोधू शकता.

Voting List | Sarkaranama

वेबसाईट

तसंच 'electoralsearch.eci.gov.in' या वेबसाईटवर तुमचे नाव तुम्ही शोधू शकता. या लिंकवर क्लिक करताच एक पेज सुरु होईल. जिथे तुमचे, वडिलांचे नाव, जन्मतारीख इत्यादी विचारलेली माहिती भरताच कॅप्चर कोड टाकल्यानंतर नावाची यादी दिसेल.

Voting List | Sarkaranama

मतदार आयडी

तुम्ही EPIC किंवा मतदार आयडी क्रमांक टाकूनही मतदार यादीतील तुमचं नाव त्वरित शोधू शकता.

Voting List | Sarkaranama

Next : ओळखपत्राशिवाय कसं कराल मतदान; वाचा एका क्लिकवर..!

येथे क्लिक करा...