Amma Manasu : 'अम्मा मानसू'चा जगात डंका, काय आहे केरळममधील खास उपक्रम?

सरकारनामा ब्यूरो

अम्मा मानसू

'अम्मा मानसू' (आईचे गन) हा केरळममध्ये राबविण्यात येणारा मानसिक आरोग्य उपक्रम आहे

डब्लूएफकडून कौतुक

मातांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणाऱ्या केरळममधील 'अम्मा मानसू मोहिमेचे जागतिक आर्थिक मंचाने (डब्लूएफ) कौतुक केले आहे.

आदर्श माॅडेल

प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्वात नैराश्याच्या तपासणीला नियमित मातृ आरोग्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी ही मोहीम एक आदर्श मॉडल असल्याचे मंचाने म्हटले आहे.

केरळ आघाडीवर

जागतिकपातळीवर सध्या महिलांच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात येते. निदान आणि फॉलो-अप सेवांमधील त्रुटी अद्याप कायम असताना केरळम सरकारने मात्र या आघाडीवर मोठी प्रगती केल्याचे हा अहवाल सांगतो.

अहवाल प्रसिद्ध

यात मातेच्या मानसिक आरोग्य तपासणाली विशेष प्राधान्य दिले जाते. नियमित प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात काळजीमध्ये समावेश करण्यात आला आहे.'मॅककिन्नसे हेल्थ इन्स्टिट्यूट' (एमएचआय) च्या सहकायनि हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

धोका टाळू शकतो

कमकुवत आरोग्यामुळे महिलांच्या आयुष्यातील अनेक वर्षे वाया जाण्याचा धोका असतो. तो या माध्यमातून टाळता येऊ शकेल.

मानसिक आरोग्य महत्त्वाचे

भारतामध्ये माता आणि अर्थक यांच्यादृष्टीने मानसिक विकार ही एक गंभीर समस्या आहे परंतु त्याकडे गांभीयनि लक्ष दिले जात नाही. केरळमला ही मोहीम राबविताना जे अनुभव आले त्याचा समावेश राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये करण्यात येईल

5 देश, 1 मिशन! PM मोदींच्या दौऱ्याचे मोठे फायदे : जगभरात मोदींची डिप्लोमसी

PM Narendra Modi begins five-country tour
येथे क्लिक करा