Rajanand More
उत्तर प्रदेशातील डुमरियागंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
2009 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले. 2014 मध्ये भाजपात प्रवेश. सलग चारवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली.
1998 मध्ये राज्यपालांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त केल्यानंतर जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रपिदाची शपथ दिली होती.
कल्याण सिंह यांनी हायकोर्टात केलेल्या याचिकेनंतर कोर्टाने राज्यपालांचा निर्णय रद्द केल्याने पाल यांना पायउतार व्हावे लागले. ते केवळ एक दिवस मुख्यमंत्री होते.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये 2002 मध्ये कॅबिनेट मंत्री होते. 1993 ते 2007 दरम्यान तीन वेळा विधानसभेचे सदस्य होते.
वक्फ (सुधारित) विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्याला विरोधकांनी जोरदार विरोध केल्यानंतर सरकारने विधेयक मागे घेतले.
विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. या समितीमध्ये 31 सदस्य असून जगदंबिका पाल यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
पाल यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तसेच चारवेळ खासदार झाले असल्याने वरिष्ठतेनुसार त्यांना संधी देण्यात आल्याचे मानले जाते.