सरकारनामा ब्यूरो
लोकसभेसह राज्यसभेतही 'वक्फ बोर्ड' दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे मोठे बदल होणार आहेत.
वक्फ बोर्डच्या संपत्तीचा आकडा समोर येत आहे, तर यावरूनच भारतातील हिंदू मंदिरांकडे किती जमीन आहे. आणि या जमिनीवर हक्क कुणाचा असतो, यावरुनही प्रश्न विचारले जात आहेत.
भारतातील हिंदू मंदिरांचा एकूण आकडा मोठा असल्याने राज्य सरकारांनी मंदिरांच्या अंतर्गत असलेल्या जमिनीची माहिती दिली आहे. यात चार राज्यांतील मंदिरांकडे किती जमीन आहे यांची माहिती जाणून घेऊयात...
CAG रिपोर्टनुसार, दक्षिण भारतातील चार राज्यात सर्वात जास्त मंदिरे आहेत. यात दक्षिण भारतातील तमिळनाडू सरकारकडे 44 हजार मंदिरे असून त्यांच्याकडे एकूण 5 लाख एकर जमीन असल्याची माहिती मिळाली आहे.
आंध्र प्रदेशच्या देणगी विभागाने त्यांच्या येथील मंदिरे जास्त असून त्यांच्याकडे एकूण 4.4 लाख एकर जमीन असल्याचे सांगितले आहे.
तेलंगणातील एकूण 87 एकर आणि ओडिसामध्ये 13 एकर जमीन मंदिराच्या अधीन येतात. अशाप्रकारे चारही राज्यांचा जमिनीचा एकूण आकडा 10 लाख एकर इतका आहे.
रिपोर्टनुसार, संपत्तीचा आकडा पाहिला, तर चर्चकडे 1 कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिरुपती बालाजी मंदिराची एकूण संपत्ती 2 लाख कोटी असल्याचं यात म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि ए.एस. बोपण्णा यांनी सांगितले की, मंदिरातील पुजारी या संपत्तीचे मालक नसून ज्यांनी ही मंदिरे बांधली आहेत. तेच या संपत्तीचे मालक असतील.