Pune : दीनानाथ मंगेशकरसारख्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार कसे मिळतात?

सरकारनामा ब्युरो

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत आले आहे.

प्रसुतीपूर्वीच दहा लाख रुपये भरण्याची मागणी करत रूग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेतल्याचा आरोप रुग्णालयावर आहे.

पण अशा धर्मादाय रुग्णालयात उपचार कसे घ्यावेत? त्यासाठीच्या नियम आणि अटी काय आहेत?

रुग्णाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 85 हजारापर्यंत असणार्‍यांसाठी 10 टक्के राखीव खाटा 100% मोफत उपचाराकरीता आरक्षित ठेवण्यात येतात.

रुग्णाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजारापर्यंत असणाऱ्यांसाठी 10 टक्के राखीव खाटा 50% सवलतीच्या दरात उपचाराकरीता आरक्षित ठेवण्यात येतात.

ऑगस्ट 2022 पर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात एकूण 476 धर्मादाय रुग्णालये आहेत. यात 10, 447 खाटा राखीव आहेत.

धर्मादाय रूग्णालयाने निर्धन रूग्ण निधी निर्माण करून यात वर्षभरात एकूण रुग्णांकडून मिळणाऱ्या रक्कमेतील 2 टक्के रक्कम या निधीत जमा करणे बंधनकारक आहे.

या 2 टक्के जमा रक्कमेतून धर्मादाय रूग्णालयाने निर्धन व आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांवर उपचार करावेत अशी अट आहे.

यासाठी रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि दारिद्रय रेषेखालील पुरावा या कागदपत्रांची आवश्यकता भासते.

रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वैद्यकीय समाज सेवक यांना भेटून आपली माहिती व वरील वैद्यकीय कागदपत्रे तपासणीसाठी द्यावीत.

तातडीच्या वेळी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांस ताबडतोब दाखल करून घेवून रुग्ण स्थिर होईपर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

first patients of mucormycosis in vidarbha spends crore for treatment

रुग्णांना रुग्णालयातील उपचाराबाबत काही अडचण आल्यास संबधित धर्मादाय निरीक्षक किंवा धर्मादाय कार्यालयाकडे दाद मागता येते.

Free Treatment in Public Hospital : | Sarkarnama

सोनिया गांधींकडे पत्रांचे 51 बाॅक्स, पंडित नेहरुंशी आहे खास कनेक्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sonia Gandhi Ex PM Pandit Nehru | sarkarnama
येथे क्लिक करा