Rashmi Mane
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भीषण आपत्तीनंतर भारतीय लष्कराचे जवान रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
आता भारतीय लष्कराच्या जवानांनी वायनाड भूस्खलन भागात अवघ्या 16 तासांत 190 फूट लांबीचा बेली पूल उभारला आहे.
मराठमोळ्या मेजर सीता शेळके यांच्या नेतृत्वाखाली, बेंगळुरूमधील भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी (मद्रास सॅपर्स) गटाने गुरुवारी वायनाड जिल्ह्यातील 190-फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम पूर्ण केले.
भारतीय लष्कराच्या मद्रास इंजीनियरिंग गटाने 1 ऑगस्ट रोजी 190 फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे.
या बेली ब्रिज वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमला या सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांना जोडण्यास मदत करणार आहे.
या आपत्तीत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असण्याची तसेच 200 हून अधिक लोक बेपत्ता असण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
बेली ब्रीजचे काम 31 जुलैला रात्री 9 वाजता सुरू झाले होते. त्यानंतर तब्बल 16 तासांच्या अथक मेहनतीनंतर हे काम पूर्ण करण्यात आले.
कन्नूर विमानतळावरून बेली ब्रीजचे सामान 17 ट्रकांमध्ये भरून वायनाडला नेण्यात आले. बेली ब्रीज एक प्रकारचा पोर्टेबल ब्रीज आहे. जो प्री-फॅब्रिकेटेड स्टील पॅनल्सनी बनवला जातो. हे तंत्रज्ञान 1940-1941 मध्ये दुसऱ्या महायुद्धात सैन्यासाठी इंग्रजांनी विकसित केला होता.