Mangesh Mahale
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'तांडव' ही मालिका २०२१ मध्ये प्रदर्शित झाली होती. सत्तेचा लोभ ,यातील कारस्थाने यात दाखवली आहेत. सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया आणि मोहम्मद जीशान अय्युब महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
जयदीप अहलावत यांच्या मालिकेचे आतापर्यंत दोन सीझन झाले आहेत. पहिल्या सीझनची कथा एका पत्रकाराच्या हत्येच्या प्रयत्नावर आधारित आहे. सीझन २ मध्ये आसाम, नागालँडमधील राजकीय पेचप्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशातील सत्ता-राजकारण आणि गँगस्टर दुनियेची कहाणी आहे. रसिका दुग्गल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदु शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.आतापर्यंत 'मिर्झापूर'चे 3 सीझन प्राइम व्हिडिओवर आले आहेत.
ही मालिका आयपीएल क्रिकेटचे राजकारण, मॅच फिक्सिंग आणि क्रीडा विश्वाचे वास्तव जग उलगडते. तनुज विरवानी, सयानी गुप्ता, ऋचा चड्ढा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका राजकारणाची ही उत्तम कहाणी सांगते.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची ही एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रत्येक स्तरावरील राजकारणावर आधारित आहे. अभिनेता मनोज वाजपेयी व्यतिरिक्त शारिब हाश्मी आणि प्रियमणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
जितेंद्र कुमारची 'पंचायत' ही गावावर आधारित ही कॉमेडी-ड्रामा मालिका आहे. पंचायत निवडणुका, सत्तासंघर्ष, भ्रष्टाचार आणि सामाजिक बदल या मालिकेत दाखवला आहे. यात रघुवीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय आणि फैजल मलिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत
राज आणि डीके यांचा हा ब्लॅक कॉमेडी-क्राईम थ्रिलर बनावट पैशांच्या व्यवसायातून भ्रष्टाचार आणि सत्तेचे वास्तव समोर आणतो. विजय सेतुपतीनेही आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली.