Sayantika Banerjee : राजभवनात जायला भीती वाटतेय म्हणणाऱ्या महिला आमदार कोण? अजून पदाची शपथ नाही...

Rajanand More

सायंतिका बॅनर्जी

सायंतिका बॅनर्जी या पश्चिम बंगालमधील अभिनेत्री असून त्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत.

Sayantika Banerjee | Sarkarnama

2021 मध्ये राजकारणात

विधानसभा निवडणुकीआधी राजकारणात प्रवेश केला. तृणमूलचे तिकीटही मिळाले मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

Sayantika Banerjee | Sarkarnama

लोकसभेसाठी इच्छूक

विधानसभेतील पराभवानंतर पक्षात पुन्हा सक्रीय. लोकसभेत तिकीटाची मागणी. पण तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या होत्या.

Sayantika Banerjee | Sarkarnama

पोटनिवडणुकीत तिकीट

2024 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत बरानगर मतदारसंघातून तिकीट. मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला.

Sayantika Banerjee | Sarkarnama

विजय मिळाला पण...

पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याचा आनंद साजरा केला असला तरी अजून राज्यपालांनी आमदारकीची शपथ दिलेली नाही.

Sayantika Banerjee | Sarkarnama

राजभवनाची भीती

राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याविरोधात एका महिलेची विनयभंगाची तक्रार. त्यामुळे राजभवनामध्ये जायला भीती वाटत असल्याने विधानसभा अध्यक्षांनी शपथ द्यावी, अशी मागणी सायंतिका यांनी केली आहे.

Sayantika Banerjee | Sarkarnama

राज्यपालांचा नकार

राज्यपालांनी 26 जूनला शपथ घेण्यासाठी वेळ दिला होता. पण सायंतिका न गेल्याने तसेच राज्यपालांनीही ठिकाण बदलण्यास नकार दिल्याने शपथ रखडली.

Sayantika Banerjee | Sarkarnama

शपथेसाठी आंदोलन

सदस्यत्वाची शपथ लवकर दिली जावी यासाठी सायंतिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करत आहेत.

Sayantika Banerjee | Sarkarnama

विधानसभेत प्रवेश नाही

सदस्यत्वाची शपथ घेतल्याशिवाय सायंतिका यांना विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेता येणार नाही. निवडणुकीच्या निकालाला 4 जुलैला महिना पूर्ण होईल.

Sayantika Banerjee | Sarkarnama

NEXT : नक्षलग्रस्त भागातील 'लेडी सिंघम'