Deepak Kulkarni
अभिनेते व भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांचा पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रचंड प्रभाव असल्याचं दिसून आलं आहे.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मिथुन यांच्यावर आता अतिशय मोठी राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील भाजप सरकारनं चक्रवर्ती यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे
सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप सरकारकडून मिथुन यांची माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना बंगालच्या राजकारणात आदरानं 'महागुरु' संबोधलं जातं. म्हणूनच अधिकारी यांच्या सरकारनं त्यांची मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हेच यापूर्वी पश्चिम बंगाल सरकारमध्ये माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागात सल्लागार पदाचा कार्यभार सांभाळत होते.
आता मिथुन यांनी नुकत्याच पार पडलेल्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार प्रचार केला होता. त्यामुळेच त्यांना भाजपकडून हे गिफ्ट मिळालं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सरकारने काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, ही नियुक्ती तातडीनं लागू होणार आहे. तसेच सरकारच्याच पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलपती विजय यानं राजकीय एन्ट्रीनंतर पहिल्याच टर्ममध्ये तमिळनाडूचं मुख्यमंत्री खेचून आणलं आहे. त्याच्यानंतर आता अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावरही महत्वाची राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.