Rajanand More
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
हुमायूं कबीर हे बेलडांगा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना आता टीएमसीतून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केल्यानंतर कबीर वादात सापडले होते. त्यावरून ममतादीदींनाही टीकेला तोंड द्यावे लागले. त्यामुळे कबीर यांनी निलंबित करण्यात आले.
पक्षातून निलंबित केल्यानंतर कबीर यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करत आगामी निवडणुकीत तब्बल १३५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे.
ममता बॅनर्जी २०२६ मध्ये मुख्यमंत्री होणार नाही, असे भाकितही त्यांनी वर्तविले आहे. तसेच ममतांना त्यांनी आरएसएसचे एजंटही म्हटले आहे.
हुमायूं कबीर यांना बंगालमधील मातब्बर मुस्लिम नेते म्हणून ओळखले जाते. ते राजकारणात २६ वर्षांपासून सक्रीय आहेत.
काँग्रेसमधून १९९३ मध्ये राजकीय कारकीर्द सुरू. २०११ मध्य पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर वर्षभरातच तृणमूलमध्ये प्रवेश करत मंत्रिपदही मिळवले. पण पोटनिवडणुकीत पराभव.
२०१५ मध्ये टीएमसीतून पहिल्या निलंबित केल्यानंतर समाजवादी पक्षात प्रवेश. त्यानंतर काँग्रेस, भाजप आणि पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश असा राजकीय प्रवास.