Aslam Shanedivan
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. अशातच ईडीने मोठी कारवाई केली आहे.
पश्चिम बंगालच्या कुप्रसिद्ध कोळसा घोटाळ्याशी प्रकरणात संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे.
या कारवाईत ईडीने राजकीय सल्लागार संस्था 'आय-पॅक'चे संचालक आणि सह-संस्थापक विनेश चंडेल यांना अटक केली आहे.
ईडीने सोमवारी विनेश चंडेल यांना दिल्लीत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ताब्यात घेत कारवाई केली आहे.
विनेश चंडेल हे भारतीय राजकीय रणनीतीच्या जगात एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात. ते आय-पॅक चे प्रमुख संस्थापक आणि व्यक्तींपैकी एक आहेत
आय-पॅकची स्थापना प्रशांत किशोर, प्रतीक जैन आणि ऋषीराज सिंग यांच्यासोबत विनेश चंडेल यांनी केली होती.
विनेश चंडेल कंपनीच्या धोरणात्मक कामकाज पाहतात. तसेच ते आता पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या निवडणूक प्रचाराच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले
आय-पॅक भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय सल्लागार कंपन्यांपैकी एक असून विनेश चंडेल यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.