Deepak Kulkarni
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल) निधन झाले. शनिवारी संध्याकाळी त्यां ना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
नात जनाई भोसलेने आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना आजीला अतिशय थकवा जाणवत असल्यानं आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं होतं.
जनाई भोसले ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे.
आजी आशा भोसलेंप्रमाणेच जनाईनेही गायनात आपलं नशीब आजमावताना दिसून येत आहे. तसेच ती लवकरच 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात झळकणार आहे.
जनाईची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ असून तिला इन्स्टाग्रामवर तब्बल 194K फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या 'कहंदी है' गाण्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
जनाईचा जन्म 2002 मध्ये मुंबईत झाला. ती आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अहुजा भोसले यांची कन्या आहे. तिचं कुटुंब संगीतविश्वात अत्यंत प्रसिद्ध आहे
जनाईला अगदी बालवयापासूनच संगीत, नृत्य आणि रंगभूमीचं आकर्षण होतं. तसंच तिला पोषक वातावरणही लाभलं.
जनाईचं शिक्षण परदेशात अर्थात स्वित्झर्लंडमधील प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ले रोझे या शाळेत शिक्षण झाल्याची माहिती समोर येत आहे.