Aslam Shanedivan
नुकताच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्या असून येथे काँग्रेसने केवळ दोन जागा जिंकल्या.
ज्यात एक फरक्काची जागा असून येथे मोताब शेख विजयी झाले आहेत. पण त्यांचा हा प्रवास खडतर होता
मोताब शेख यांचे नाव मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनातून (SIR) वगळण्यात आले होते.
ज्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाविरुद्ध कायदेशीर लढा दिला. त्यांना यात यश आले आणि शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले.
यानंतर त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपचे सुनील चौधरी यांचा ८ हजार मतांनी पराभव केला आणि ते आमदार झाले.
मोताब यांचे नाव वगळण्यात आल्यानंतर निवडणूक आयोग आणि एका न्यायिक अधिकाऱ्याकडे पासपोर्टसह अनेक कागदपत्रे सादर केली. तरीही त्यांचे नाव वगळण्यात आले
या निर्णयाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. ज्यात न्यायाधिकरणाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हे प्रकरण त्याचा निपटारा करण्याचे निर्देश दिले.
ज्यानंतर नामांकन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस आधी त्यांचे नाव जोडले गेले. आणि त्यांनी ८,००० मतांनी विजय मिळवला
Chandranath Rath: भावी CM च्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या; एअर फोर्स ते राजकारण, कोण होते चंद्रनाथ रथ?