ममता बॅनर्जींचा CM पद सोडण्यास नकार; पुढे काय होणार? राज्यपालांसमोर आहेत 'हे' 2 पर्याय...

Jagdish Patil

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 207 जागा मिळवून बहुमताचा आकडा गाठला आहे.

West Bengal | Sarkarnama

सत्ता

त्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असतानाच ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे.

BJP | Sarkarnama

ममता

निवडणूक आयोगाने भाजपसाठी काम केलं असून मी लोकमताद्वारे पराभूत झाली नसल्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही, असं ममता यांनी म्हटलं आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

पेच

मात्र, ममता यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा न दिल्याने घटनात्मक पेच निर्माण झाल्यास त्यावर नेमका उपाय काय? हे जाणून घेऊया.

Mamata Banerjee | Sarkarnama

संविधान

भारतीय संविधानातील कलम 164 मधील तरतूदीनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपालांतर्फे केली जाते.

Indian Constitution | Sarkarnama

राज्यपाल

मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार करण्याचा घटनात्मक अधिकारही राज्यपालांना आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

अधिकार

त्यामुळे घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांना पदावरुन दूर करण्याचा अधिकार आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

पर्याय

त्यामुळे बॅनर्जी यांनी स्वतःहून पद सोडले नाही, तर राज्यपालांकडे दोन पर्याय असतील.

Mamata Banerjee | Sarkarnama

विधानसभा

एक मुख्यमंत्र्यांना सन्मानाने राजीनामा देण्यास सांगणं आणि दुसरा त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देणे.

West Bengal Assembly | sarkarnama

बरखास्त

तर बंगालची विधानसभा 7 मे रोजी बरखास्त होत असल्याने संविधानातील तरतुदीनुसार नव्या विधानसभेच्या स्थापनेआधी ममतांना राजीनामा द्यावा लागणार आहे.

mamata banerjee | Sarkarnama

NEXT : ममतांचे विश्वासू सहकारी ते भाजपचा CM पदाचा चेहरा, बंगालमध्ये TMC चा सुपडासाफ करणाऱ्या सुवेंदू अधिकारींची हिस्ट्री...

Suvendu Adhikari | Sarkarnama
क्लिक करा