Aslam Shanedivan
सध्या सोशल मीडियावर IPS बुशरा बानो या महिला अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
IPS बुशरा बानो या पश्चिम बंगालमध्ये खडगपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक असून त्या २०२१ बॅचच्या आहेत.
त्या व्हिडीओमुळे त्यांची उचलबांगडी झाली असून त्यांना राज्य सशस्त्र पोलिसात डेप्युटी कमांडंट पदावर पाठवण्यात आले आहे.
त्या व्हिडीओत IPS बुशरा बानो या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
त्यांनी स्पर्धा परीक्षांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. पण आता याच व्हिडीओवरून त्यांच्यावर टीका होत आहे.
या व्हिडीओत IPS बानो यांनी अस्सलामुअलैकुम, इन्शाअल्लाह आणि जजाकल्लाह अशा शब्द वापरले आहेत.
पण जय हिंद किंवा वंदे मातरम् अशा राष्ट्रीय अभिवादनांचा वापर केलेला नाही. आता यावरून हिंदू लीगल फंड नावाच्या एका वेबसाइटने गृह सचिवांकडे तक्रार केली आहे.