पश्चिम बंगालमध्ये जाऊन थेट ममतांच्या नेत्याला भिडले; या 'सिंघम' IPS अधिकाऱ्याच्या दणक्याची सर्वत्र चर्चा...

Jagdish Patil

दुसरा टप्पा

पश्चिम बंगालमधील मतदानाचा दुसरा टप्पा उद्या, 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

अजय पाल शर्मा

या पार्श्वभूमीवर UP पोलिसांमधील 'सिंघम'आणि ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेल्या अजय पाल शर्मांची बंगालमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

वाद

शर्मा यांची दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात नियुक्ती केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

अभिषेक बॅनर्जी

कारण हा जिल्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

TMC

नियुक्तीनंतर, शर्मांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ते TMC चे उमेदवार जहांगीर खान यांच्या समर्थकांना इशारा देतायत.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

अखिलेश यादव

अखिलेश यादव यांनी शर्मा यांना ‘भाजपचे एजंट’ असे म्हणत, बंगालमध्ये ‘दीदी’ कायम राहतील, असे वक्तव्य केले आहे.

Akhilesh Yadav | Sarkarnama

गणना

शर्मा यांच्या कारकिर्दीची गणना उत्तर प्रदेश पोलिसांतील कडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

IPS

शर्मा 2011 च्या तुकडीतील IPS अधिकारी असून, नोएडा आणि जौनपूर जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारांविरुद्ध राबवलेल्या त्यांच्या एन्काऊंटर मोहिमा चर्चेत राहिल्या होत्या.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

शंका

आता त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत टीएमसीने निवडणूक आयोगाच्या हेतूंविषयी शंका व्यक्त केली आहे.

Ajay Pal Sharma Controversy | Sarkarnama

सवाल

आयोगाला एवढा धोका जाणवतो आहे का की त्यांना एका “एन्काऊंटर स्पेशालिस्ट”ची गरज भासली? असा सवाल टीएमसी नेत्यांकडून केला जात आहे.

TMC | Sarkarnama

NEXT : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची धक्कादायक हिस्ट्री आली समोर...

Cole Thomas Allen Profile | Sarkarnama
क्लिक करा