सरकारनामा ब्यूरो
आयएफएस अधिकारी तमाली साहा यांनी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
कमी वयात अन् पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या तमाली या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत.
तमाली यांच्या यशाने केवळ त्यांचे कुटुंबच नाही तर त्यांचा मित्रपरिवार आणि समाजातील सगळ्या लोकांच्या माना उंचावल्या आहेत.
हे शिखर गाठण्यासाठी त्यांची कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे.
तमाली यांच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात ही पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा या छोट्याशा गावातून झाली.
गावातूनच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून प्राणीशास्त्राची पदवी संपादन केली.
महाविद्यालयीन जीवनापासूनच UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या ध्येयावर त्या ठाम होत्या.
UPSC ची भारतीय वन सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात 94 व्या क्रमांकासह त्यांनी उत्तीर्ण करून हे स्वप्न पाहणाऱ्या अनेक इच्छुकांना प्रेरणा दिली आहे.
R