Deepak Kulkarni
वन्यप्राणी बिबट्यांचा ग्रामीणसह शहरी भागातील मानवी वस्तीतील वावर वाढला आहे.
बिबट्याचं दर्शन मानवी वस्तीत वाढल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. एवढंच नाही तर, काही ठिकाणी महिला, लहान मुलांवर हल्लेही बिबट्याकडून केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद किंवा ठार मारण्याची मागणी केली जात आहे.
वनविभागाला वन्य प्राणी बिबट्या किंवा एखाद्या इतर शिकारी प्राण्याला जेरबंद किंवा ठार मारण्यासाठीची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे,जाणून घेऊयात.
तत्सम बिबट्या किंवा इतर वन्य प्राणी मानवी वस्तीत दिसला,किंवा जनावरांवर हल्ले वाढले, जनतेचा रोष आहे, अशी कारणे या प्रक्रियेसाठी अपुरी ठरतात.
जेरबंद करण्यासाठी ओळख बंधनकारक
संबंधित वन्य प्राण्यांसाठी कॅमेरा ट्रॅप, पावलांचे ठसे,डीएनए पुरावे इत्यादींचा अप्रत्यक्ष पुरावा गोळा करणे आवश्यक असतं. तसेच वनविभागालाही या कारवाईसाठी प्रस्तावात हे पुरावे जोडणे बंधनकारक असतं.
वनविभागाच्या वनरक्षक, वनपाल, क्षेत्र अधिकारी अशा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ उपस्थित राहून गावकऱ्यांशी समन्वय ठेवत कॅमेरा ट्रॅप लावावे, गस्ती वाढवणे. संभाव्य हल्ले टाळण्यासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे असते.
ठार मारण्याची कायदेशीर परवानगी
मानवी हल्ल्यानंतर उपवनसंरक्षक/DFO यांनी तात्काळ तपास समिती गठीत करावी. समितीचा सखोल अहवाल तयार केला जातो. तसेच आधी जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केल्याचा तपशील प्रस्तावात जोडावा.लागतो. यानंतर संबंधित हिंस्त्र झालेला तो प्राणी ठार मारणे गरजेचं आहे, हे सिद्ध करावं लागतं. यानंतर ठार मारण्याची कायदेशीर परवानगी दिली जाते.