Jagdish Patil
नागपुरात आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील जवळपास 7645 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आलं.
PM मोदींनी लोकार्पण आणि पायाभरणी केलेली विकासकामे नेमकी कोणती? याबाबतची माहिती जाणून घेऊ.
मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील अंदाजे 7 हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला.
इथे एकाच वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
645 कोटी किंमतीच्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन.
राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
हिंगोली, वाशिम अमरावती, अमरावती, भंडारा आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरीमुळे MBBS अभ्यासक्रमाच्या 900 जागां वाढणार.
तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्रा यांचेही उद्घाटनही मोदींनी केलं.