Rashmi Mane
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या तीन पुरस्कारांची घोषणा 25 जानेवारीला केली गेली.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात हा सन्मान दिला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान देतात.
राष्ट्रपती पद्म पुरस्कार विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देतात. सोबत एक प्रतिकृतीही देण्यात येते.
सन्मान प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे किंवा विमानात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा मिळत नाहीत.
भारत सरकारने 1954 मध्ये पद्म पुरस्कार सुरू केला. 1955 पासून हे तीन पुरस्कार श्रेणींमध्ये दिले जातात.
कला, साहित्य, शिक्षण, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील अपवादात्मक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
भारत सरकार हा सन्मान वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना देते.