Rashmi Mane
भारत आणि ईरान यांच्यातील व्यापाराचे संबंध ऐतिहासिक आहेत. चला पाहूया भारत ईरानकडून कोणत्या मुख्य वस्तू आयात करतो.
भारत आणि ईरान यांच्यातील व्यापार फक्त वस्तूंपुरता मर्यादित नाही, तर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंधांचाही तो एक भाग आहे.
ईरानकडून भारत मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करत होता. अमेरिकेच्या निर्बंधांपूर्वी, भारतासाठी ईरान एक प्रमुख तेल पुरवठादार देश होता.
ईरानचे पेट्रोकेमिकल्स म्हणजे प्लास्टिक, केमिकल्स, वायूचे घटक भारतात औद्योगिक वापरासाठी आयात होतात.
ईरानकडून भारतात मोठ्या प्रमाणावर खजूर, बदाम, पिस्ता आणि सुकामेवा येतो.
खासकरून रमजानमध्ये याची मागणी वाढते.
ईरान हे जगातील सर्वात मोठं केशर उत्पादक देश आहे. भारत या उच्च दर्जाच्या केशरची मोठ्या प्रमाणावर आयात करतो.
भारत इराणमधून मौल्यवान दगड आणि मोती देखील आयात करतो. याशिवाय, भारतीयांना इराणी काचेच्या वस्तू खूप आवडतात.
लोखंड, तांबे, अॅल्युमिनियम यांसारखी धातू आणि खनिजं भारतात बांधकाम आणि उत्पादनासाठी येतात.