सरकारनामा ब्यूरो
भारत हा इस्रायलचा आशियातील दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.
इस्त्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम भारताच्या व्यापारावर होणार आहे.
इराणकडून भारत काचेच्या विविध वस्तू खरेदी करीत असतो.
बासमती तांदुळाची मोठ्या प्रमाणात भारताकडून इराण आयात करतो.
भारत दरवर्षी इराणकडून मोठ्या प्रमाणात सुका मेवा खरेदी करतो.
जर इराणवर आर्थिक निर्बंध लादले गेले तर कच्चे तेल प्रति बॅरल सात डॉलरने महाग होऊ शकते.
इस्रायलने इराणच्या ऊर्जा प्लांट्सवर हल्ला केल्यास कच्चे तेल प्रति बॅरल 13 डॉलरने महाग होऊ शकते.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा खंडित झाल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $13 ते $28 पर्यंत वाढू शकते.
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष वाढण्याच्या भीतीने बँकिंग आणि खाण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
NEXT : प्रत्येक टर्ममध्ये लाल दिवा मिळवणारे इंदापूरचे पाटील आता पवारांच्या आखाड्यात