Roshan More
अहमदाबादहून इंग्लंडसाटी उड्डान केलेल्या एअर इंडियाचे बोईंगचे 787 ड्रीमलायनर विमानाला अपघात झाला. हे विमान एका इमारतीवर कोसळली.
या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते.
या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे विमानातील ब्लॅक बाॅक्समुळे कळणार आहे.
ब्लॅक बॉक्स हा विमानातील एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असतो, जो उड्डाणावेळी होणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची नोंद ठेवतो.
ब्लॅक बॉक्समध्ये पायलट्सचे संभाषण, इशारे आणि ध्वनी, उड्डाणाशी संबंधित 80 पेक्षा अधिक प्रकारची माहिती – वेग, उंची, इंजिन स्थिती, सिग्नल नोंदवले जातात.
ब्लॅक बॉक्स हे अपघातानंतर नेमके काय झाले हे उलगडण्यास मदत करते. विमान कोसळण्याचे कारण, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक याचा तपशील यातून मिळतो.
ब्लॅक बॉक्स कोण शोधतो?
एअर ट्रॅफिक कंट्रोल, अपघात तपास यंत्रणा (जसे की DGCA, NTSB) आणि बचाव पथक ब्लॅक बॉक्स शोधतात.