सरकारनामा ब्यूरो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार (ता.6) नागपूर येथे 'अभय' योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 च्या नागरीकांना पट्ट्यांचे वाटप केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडीधारकांसाठी अभय योजनेतून 'सर्वांसाठी घरे' या धोरणांतर्गत नागपूर शहरातील नागरीकांना पट्ट्यांचे वाटप केले आहे. तर याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात झोपडीधारक 'अभय योजना' काय आहे.
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना, महावितरण अभय योजना, उल्हासनगर महानगरपालिकेची अभय योजना, झोपडीधारकांसाठी अभय योजना. अशा अभय योजनेचे प्रकार आहेत.
झोपडपट्टी धारकांच्या झोपडीची खरेदी विक्रीचा व्यवहार नियमित करण्यासाठी 'अभय योजना' राबवण्यात येते.
निवासी झोपडीसाठी 25 हजार आणि अनिवासी झोपडीसाठी 50 हजार रुपये शुल्क आकारून ती झोपडी अधिकृतपणे त्या धारकाला दिली जाते.
ही योजना मुख्यता मुंबई आणि ठाण्यातील झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात आली आहे.
या योजनेत सर्वप्रथम धारकांला अर्ज भरण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=4054 या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
आवश्यक दस्तऐवज गोळा करून ती दिलेल्या शुल्काबरोबर सेवा केंद्रात द्यायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरून द्यायचा, ज्याची पोचपावती लगेच मिळते. काही दिवसात याचे प्रमाणपत्र घरपोच दिले जाते.