ई-श्रम कार्ड म्हणजे काय? या कार्ड धारकांना मिळतात 'हे' ७ मोठे फायदे

Amit Ujagare

ई-श्रम पोर्टल म्हणजे काय?

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल केंद्र सरकारनं सुरु केलं आहे. या कामगारांना सरकारी योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागते.

E-Shram Card

नोंदणी कशी करता येते?

आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते याची माहिती देऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करता येते. १८ ते ५९ वयोगटातील कामगार या पोर्टलवर नोंदणी करु शकतात.

E-Shram Card

पेन्शनचा लाभ

'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना' या योजनेंतर्गत ई-श्रम कार्डधारकांना पेन्शन मिळवता येते. यामध्ये वयाच्या ६० वर्षानंतर महिन्याला ३००० रुपये मिळतात. यामध्ये सरकार आणि कामगार अशा दोघांचं योगदान असतं.

E-Shram Card

आरोग्य विम्याचा लाभ

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा, सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, सवलतीत औषधं तसंच नियमित आरोग्य तपासणी असे लाभही ई-श्रम कार्डधारकांना मिळतात.

E-Shram Card

मुलांना शैक्षणिक योजनांचा लाभ

ई-श्रम कार्ड धारकांच्या मुलांसाठी विविध शैक्षणिक योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये शिष्यवृत्ती योजना, स्कील इंडियांतर्गत मोफत प्रशिक्षण मिळवता येतं. व्यावसायिक शिक्षणातही यातून मदत मिळते.

E-Shram Card

आवास योजनेचा लाभ

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ई-श्रम कार्डधारकांना कमी व्याजदरात गृहकर्ज, सुलभ पात्रता, भाड्याच्या घरात राहण्यासाठी अनुदानही मिळतं.

E-Shram Card

कामगार कायद्यांचा लाभ

सर्वात महत्वाचं म्हणजे कामगार कायद्यांतर्गत कामाच्या ठिकाणी सुरक्षा, किमान वेतनाचा लाभ आणि कायदेशीर मदत ई-श्रम कार्डधारकांना मिळते.

E-Shram Card

FCRA सुधारणा विधेयकाला का होतोय विरोध? काय आहेत वादग्रस्त तरतुदी?

FCRA
इथे क्लिक करा...