Roshan More
सरकारने दिल्लीत E85 पेट्रोल लाँच केले आहे.त्याची अधिकृत विक्री देखील सुरु करण्यात आली आहे.
E85 मध्ये साधारणपणे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असते.
E85 फ्युएल स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्याच्या पेट्रोलच्या तुलनेत हे तब्बल 20 रुपयांनी स्वस्त आहे.
E85 हे सामान्य पेट्रोल वाहनांसाठी नाही. ते फक्त Flex-Fuel Vehicle (FFV) साठी बनवलेले इंधन आहे.
असे वाहन जे पेट्रोल आणि इथेनॉलच्या विविध मिश्रणांवर चालू शकते. हे वाहन इंधनातील इथेनॉलचे प्रमाण आपोआप ओळखते आणि त्यानुसार इंजिनचे कार्य करते.
E20 चा वापर सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये केला जातो. या इंधनामध्ये 20 इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असते.