What Is Electronic Bond : कागदपत्रांचा त्रास संपला; व्यवहार आता पूर्णपणे डिजिटल, काय आहे ई-बॉड प्रणाली!

Rashmi Mane

महाराष्ट्रमध्ये आता ई-बॉण्डचा शुभारंभ

महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता आयातदार आणि निर्यातदारांसाठी कागदी बाँडची गरज संपणार आहे.

Electronic Bond | Sarkarnama

कधीपासून लागू?

आजपासून राज्यात इलेक्ट्रॉनिक बाँड (ई-बॉंड) प्रणाली लागू होणार आहे, ज्यामुळे व्यवसायिक व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जलद होतील.

Electronic Bond | Sarkarnama

ई-बॉण्ड म्हणजे काय?

ई-बॉण्ड (Electronic Bond) म्हणजे एक डिजिटल कागदपत्र जो व्यवहारांसाठी कागदी बाँडची जागा घेईल.

Electronic Bond | Sarkarnama

ई-बॉण्डचे फायदे

एकाच ई-बॉण्डमध्ये सर्व व्यवहार करता येतील. प्रोव्हिजनल असेसमेंट्स, एक्सपोर्ट स्कीम्स, वेअरहाऊसिंग, मॅन्युफॅक्चरिंग साठी वापरता येईल. ई-बॉंडमुळे आयात-निर्यात व्यवसायात वेगवेगळ्या कागदी बाँडच्या गरजेऐवजी एकच ई-बॉंड वापरून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत.

Electronic Bond | Sarkarnama

पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया

या नव्या प्रणालीत महाराष्ट्र शासनाचे नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्याद्वारे तांत्रिक सहाय्याने ई-बॉंडचा तयार करण्यात आले आहे.

Electronic Bond | Sarkarnama

सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार

आयातदार आणि निर्यातदार हे सर्व व्यवहार ICEGATE पोर्टलवरून ऑनलाईन करतील, तर NeSL द्वारे ई-स्टॅम्पिंग व ई-स्वाक्षरी होईल. अखेर कस्टम अधिकाऱ्यांकडून रिअल टाइम पडताळणी होईल, ज्यामुळे फसवणूक रोखणे शक्य होईल.

Electronic Bond | Sarkarnama

ऑनलाईन शुल्क भरणे

मुद्रांक शुल्कासह सर्व शुल्कांचे भरणे पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. महाराष्ट्र स्टॅम्प कायद्यानुसार 500 रुपयांचे शुल्क आता डिजिटल पद्धतीने जमा करता येईल. आधार आधारित ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.

Electronic Bond | Sarkarnama

‘ग्रीन गव्हर्नन्स’कडे मोठे पाऊल

ई-बॉंड प्रणालीमुळे कागदपत्रांची गरज पूर्णपणे समाप्त होऊन पर्यावरणपूरक ‘ग्रीन गव्हर्नन्स’कडे मोठे पाऊल उचलले गेले आहे. आधीच्या बाँडमध्ये आवश्यक ते बदल किंवा रक्कमवाढ आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येईल.

Electronic Bond | Sarkarnama

Next : उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवून श्रद्धांजली वाहिली... कोण होते जी. जी. पारीख? 

येथे क्लिक करा