Rashmi Mane
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे.
या निर्णयानुसार अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे.
पण अंतरिम जामीन म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंतरिम जामीन हा अल्पमुदतीचा जामीन असून नियमित जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना न्यायालय तो मंजूर करते.
जेव्हा एखादी व्यक्ती नियमित जामीन किंवा नियमित जामीनासाठी अर्ज दाखल करते, तेव्हा न्यायालय या प्रकरणात आरोपपत्र किंवा केस डायरीची मागणी करते जेणेकरून सामान्य जामिनावर निर्णय घेता येईल.
या संपूर्ण प्रक्रियेस वेळ लागतो आणि कागदपत्रे न्यायालयात पोहोचत असताना व्यक्तीला कोठडीत राहावे लागते.
अशा स्थितीत कोठडीत असलेली व्यक्ती अंतरिम जामीन मागू शकते. जेणेकरून कागदपत्रे कोर्टात पोहोचेपर्यंत त्या व्यक्तीला कोठडीत राहण्यापासून दिलासा मिळू शकेल.