विधेयकावर चर्चा करणारी JPC काय आहे? अशी होते कायद्याची खरी तपासणी

Roshan More

FCRA विधेयक JPC कडे

आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. या गदरोळात FCRA विधेयक JPC कडे पाठवण्यात आले.

JPC Committee | Sarkarnama

JPC म्हणजे काय?

JPC म्हणजे 'जॉइंट पार्लमेंटरी कमिटी' (संयुक्त संसदीय समिती), जी संसदेत एखाद्या विशेष विषयाचा किंवा विधेयकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन केली जाते.

JPC Committee | Sarkarnama

दोन्ही सभागृहांचा सहभाग!

या समितीत लोक सभा आणि राज्य सभा अशा दोन्ही सभागृहांचे खासदार समाविष्ट असतात, ज्यामुळे दोन्ही बाजूंचे प्रतिनिधित्व मिळते.

JPC Committee | Sarkarnama

विधेयक JPC कडे का?

जेव्हा एखादे विधेयक अत्यंत संवेदनशील, गुंतागुंतीचे किंवा महत्त्वाचे असते, तेव्हा त्यावर सखोल चर्चा व विश्लेषणासाठी ते JPC कडे पाठवले जाते.

JPC Committee : | Sarkarnama

सर्वपक्षीय खासदारांची समिती!

JPC मध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असतो, ज्यामुळे विधेयकावर निष्पक्ष व सर्वसमावेशक चर्चा होते.

Special Parliament | Sarkarnama

तज्ज्ञ आणि जनतेचा सल्ला!

ही समिती केवळ खासदारांपुरती मर्यादित नसून, विषयाशी संबंधित तज्ज्ञ, नागरिक आणि भागधारकांकडून (Stakeholders) सूचना व हरकती मागवू शकते.

Indian Parliament session | Sarkarnama

कायदेशीर त्रुटी दूर करणे!

विधेयकातील त्रुटी, संभाव्य परिणाम आणि तांत्रिक बाबी तपासून त्यात आवश्यक त्या सुधारणा (Amendments) सुचवण्याचे महत्त्वाचे काम JPC करते.

Indian Parliament session

संसदेला अहवाल सादर करणे!

सखोल अभ्यासानंतर JPC आपला सविस्तर अहवाल संसदेत सादर करते, ज्या आधारे विधेयकात बदल केले जातात किंवा पुढील प्रक्रिया पार पडते.

Indian Parliament session

लोकशाही आणि पारदर्शकता!

घाईघाईत कायदा न करता, सर्व पैलू विचारात घेऊन परिपूर्ण कायदा बनवणे हा JPC कडे विधेयक पाठवण्यामागचा मुख्य उद्देश असतो.

Prime Minister Office Job : PMO मध्ये नोकरी! काय असते पात्रता? पगार किती मिळतो? सर्व काही जाणून घ्या...

PMO Job | Sarkarnama
येथे क्लिक करा