Rashmi Mane
पहलगाममधील हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास सांगितले आणि ज्यांना माहित नव्हते त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय.
कलमा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे. लोक सोशल मीडियावर विचारत आहेत की, इस्लाममध्ये काय महत्व आहे? जाणून घेऊया.
कलमा हा शब्द अनेकदा मुस्लिम धार्मिक संदर्भात ऐकायला मिळतो. मुस्लिम समाजात त्याचे विशेष महत्त्व आहे.
इस्लाममध्ये एकूण सहा मुख्य कलमे आहेत, त्यापैकी पहिले 'अव्वल कलमा तय्यब' आहे.
"ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलल्लाह, सल्ललाहू अलैही वस्सलम.... ज्याचा अर्थ अल्लाहशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही आणि मुहम्मद हे अल्लाहने पाठवलेले संदेशवाहक आहेत.
कलमा पठण करणे हे धार्मिक श्रद्धा आहे.
कलमा हा अरबी शब्द आहे आणि इस्लाममध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. ही एक प्रकारची धार्मिक घोषणा आहे, ज्याचा अर्थ वचन किंवा शपथ असा होतो.
इस्लामच्या पाच स्तंभांपैकी हे पहिले आणि सर्वात महत्वाचे आहे. इस्लामचे पाच स्तंभ म्हणजे कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज.