Rashmi Mane
भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील राज्यांना अलर्ट केले आहे.
देशातील तब्बल 244 शहरांमध्ये बुधवारी एकाचवेळी सुरक्षेच्या तयारीबाबतचे मॉक ड्रील घेतले जाणार आहे.
या यादीत मुंबई, पुण्यासह, उरण-जेएनपीटी, तारापूर, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
देशात 7 मे म्हणजे बुधवारी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 244 ठिकाणी नागरी संरक्षण सराव आणि तालीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मॉक ड्रिल म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेली एक पूर्वाभ्यास प्रक्रिया.
यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत लोकांनी कसे वागावे, याचे प्रशिक्षण दिले जाते.
अशा ड्रिल्समध्ये अग्निशमन, भूकंप, पूर, किंवा इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचे सराव केले जातात.
यापूर्वी 1971 मध्ये मॉक ड्रिल झाले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि पाकिस्तान युद्धात असताना घेण्यात आला होता.
भारतात विविध राज्यांमध्ये वेळोवेळी मॉक ड्रिल्स घेतल्या जातात. 2024 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल्स आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्रातही शालेय स्तरावर आणि सरकारी कार्यालयांमध्ये अशा सरावांचे आयोजन झाले होते.
म्हणजेच 54 वर्षांनंतर पुन्हा एकदा असा आदेश जारी करण्यात आला आहे. त्या काळात, नागरी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एक मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.