काय आहे POSH Law ? कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण देणारा कायदा

Ganesh Sonawane

नाशिकमधील घटना

नाशिकमध्ये TCS कंपनीत हिंदू महिला व मुलींचा झालेला लैगिंक छळ पाहाता आता पॉश कायदा चर्चेत आला आहे.

POSH Act 2013 | Sarkarnama

पॉश कायदा

POSH (Prevention Of Sexual Harassment) कायदाचा उद्देश कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करणे आणि सुरक्षित वातावरण देणे आहे.

POSH Act 2013 | Sarkarnama

२०१३

हा कायदा महिलांना सुरक्षित कार्यस्थळ देण्यासाठी २०१३ पासून लागू करण्यात आला आहे.

POSH Act 2013 | Sarkarnama

ICC

पॉश कायद्यानुसार, प्रत्येक संस्थेने अंतर्गत तक्रार समिती (Internal Complaints Committee) स्थापन करणे आणि लैंगिक छळाच्या तक्रारी हाताळण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा असणे अनिवार्य आहे.

POSH Act 2013 | Sarkarnama

खाजगी संस्थांनाही बंधनकारक

१० किंवा त्याहून अधिक कर्मचारी (कायमस्वरूपी, कंत्राटी, तात्पुरते) असलेल्या सर्व सरकारी, निमशासकीय आणि खाजगी संस्थांना ही समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

POSH Act 2013

पॉश समितीची कार्य

लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करणे आणि त्यांची दखल घेणे.तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे आणि पुरावे गोळा करणे. चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्याची शिफारस करणे.

POSH Act 2013 | Sarkarnama

दंड

समिती न स्थापन केल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास मालकास ₹५०,००० पर्यंत दंड होऊ शकतो.

POSH Act 2013 | Sarkarnama

खोटी तक्रार

खोटी तक्रार केल्यास सेवा नियमानुसार समिती कंपनीला तक्रारदार महिलेविरोधात कारवाई करण्याची शिफारस करु शकते. त्यामुळे अयोग्य तक्रार व अपुऱ्या पुरव्यांशिवाय तक्रार केली जाऊ नये असेही कायद्यात तरतूद आहे.

POSH Act 2013 | Sarkarnama

NEXT : तुम्हाला माहितीये का? पगारी रजा आणि Comp Off मागे बाबासाहेबांचाच मोठा वाटा

Dr. Baba Ambedkar ॉ | Sarkarnama
येथे क्लिक करा